राजुरी वार्ताहार विजय बोडखे
बाभळेश्वर बस स्थानक येथे एस टी महामंडळ श्रीरामपूर आगार बाभळेश्वर बस स्थानक परिसर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थिनी यांना पाचवी ते बारावी पास वितरण सोहळा व रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा अत्यंत आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय स्थानिक कुलकमिटी अध्यक्ष तुकाराम पाटील बेंद्रे माजी चेअरमन पद्मश्री विखे पाटील कारखाना हे होते.
यावेळी राहाता पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब उर्फ बबलू पाटील म्हस्के,विखे फाउंडेशनचे शंकरराव रोकडे राहता येथील माजी सैनिक भानुदास गाडेकर, बाभळेश्वर गावातील अनेक मान्यवर गावकरी एस टी महामंडळाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक बेहरे साहेब,सोनवणे साहेब हे यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी बेंद्रे पाटील अध्यक्ष बाभळेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी केले.
या प्रसंगी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयातील प्राचार्य,शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थितयावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
सर्व विद्यार्थिनींना पास वाटप करून बाभळेश्वर बस स्थानकावर येणाऱ्या चालक वाहकांना मुलींनी राख्या बांधून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन बाभळेश्वर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक आरिफ भाई शेख यांनी केले होते.
0 Comments