पर्यावरण पूरक गोमय उत्पादनाविषयी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व गोमय गणपती देऊन गौरव--




दिलीप शिंदे 
सोयगाव दि. १२-- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळा यांच्या तर्फे पर्यावरण पुरक गोमय उत्पादनविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा व जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे चार गटात दि.११ शुक्रवारी निबंधस्पर्ध घेण्यात आली होती. 

या निबंध लेखन स्पर्धेस चारही गट मिळून ६९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चारही गटातील उत्कृष्ट निबंध लेखन केलेल्या प्रत्येकी तीन असे बारा विजेत्यांना दि.१२ शनिवारी प्रशस्तीपत्र व गोमय गणपती देऊन गौरव करण्यात आला. यात १ ते ४ या गटात प्रथम क्रमांक कु. वैदिका विलास राऊत (वर्ग ३), द्वितीय हर्षल अनिल काटोले (वर्ग २),तृतीय महेश योगेश गवळे (वर्ग ४ ), ५ ते ७ या गटात प्रथम राहुल महेश जावळे (वर्ग ६ ), द्वितीय अर्चना ईश्वर सैदाने (वर्ग ७), तृतीय मोहित श्रीराम ढगे (वर्ग ६ ), उत्तेजनार्थ प्रगती ईश्वर परदेशी, जिल्हा परिषद प्रशालेतील ६ ते ८ या गटात प्रथम सृष्टी अण्णा वाघ (वर्ग ८) , द्वितीय दर्शना वाल्मीक चव्हाण (वर्ग ८ ), तृतीय मानसी भगवान पंडित (वर्ग ८), उत्तेजनार्थ अर्चना वाल्मीक चव्हाण (वर्ग ६) , वर्ग ९ ते १० गटात प्रथम गायत्री भगवान बावस्कर (वर्ग ९ ), द्वितीय भाग्यश्री संजय मिसाळ (वर्ग १०), तृतीय दुर्गा भगवान वारगणे (वर्ग १०), उत्तेजनार्थ जोस्ना वाल्मीक पाटील (वर्ग १०), देवयानी निलेश मिसाळ (वर्ग ९) यांना प्रमाणपत्र व गोमय गणपती देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शिक्षिका श्रीमती मंगला बोरसे यांनी शेण , गोमूत्र व पर्यावरण विषयी सखोल मार्गदर्शन करीत त्याचे महत्व विषद केले तर संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी संस्थेची माहिती देत देशी गाय संगोपन व संवर्धन या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष सुनील ठोंबरे, मुख्याध्यापक दादाराव राठोड, मुख्याध्यापक हरदास काटोले, किरणकुमार पाटील, आर. के. उंबरकर, शिवाजी नवले, दौलतसिंग परदेशी, संतोष भारद्वाज, विद्याधर बागुल, भास्कर चौधरी, तुकाराम पायघन, शिवराम आगे, रामचंद्र महाकाळ, सविता पाटील, गणेश बावस्कर, अकुश काळे, विवेक महाजन, अनिल देसाई, श्रीमती मंगला बोरसे, सुरेखा चौधरी, प्रतिभा कोळी, पूनम लाड, अंजनाई गोशाळा सचिव दिलीप शिंदे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सहसचिव अनिल लोखंडे, संचालक अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक सोनवणे, विजय भारवड, दत्तू काटोले आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीमती मंगला बोरसे व भास्कर चौधरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments