लोणी प्रतिनिधी ( रूपाली भालेराव )
कलेच्या क्षेत्रात यश मिळवणे जितके आकर्षक दिसते, तितकाच त्या मागचा प्रवास संघर्षमय असतो. टाळ्यांचा कडकडाट, मिळणारा सन्मान आणि प्रसिद्धीच्या झोतात दिसणाऱ्या कलाकारा मागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग, जिद्द आणि संयम दडलेला असतो. लावण्यवती शिल्पा शाहीर नागपुरकर यांचा गेल्या वीस वर्षांचा प्रवास याच संघर्षाची आणि सातत्याची प्रेरणादायी कहाणी लेखक सुनील मोंढे सर सांगतात.
वीस वर्षांचा हा प्रवास केवळ काळाचा हिशोब नाही, तर तो असंख्य चढ-उतारांचा, अडचणींचा आणि नव्या संधींचा साक्षीदार आहे. सुरुवातीच्या काळात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी करावी लागलेली धडपड, प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि कलेप्रती असलेली निष्ठा यामुळे हा प्रवास वेगळा ठरतो.
कलाकाराला केवळ प्रतिभा असून चालत नाही. त्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अनेकदा अपेक्षेप्रमाणे संधी मिळत नाही, कौतुकाऐवजी टीका सहन करावी लागते आणि अपयशानंतर पुन्हा नव्या जोमाने उभे राहावे लागते. अशा प्रत्येक प्रसंगातून शिकत शिल्पा शाहीर नागपुरकर यांनी आपला कला प्रवास पुढे नेला.
तीचा जन्म नागपुरचा सर्वसामान्य कुंटुबात जन्मलेली नुत्यांगणा नुत्यांची आवड पण घरात विरोध असतांना देखील आईने पाठीबा दिला. सोनी टि व्ही मध्ये प्रचलित असलेल्या बुगा-बुगा या शो मध्ये तीला संधी मिळाली आणी तिथुनचं या नुत्याची प्रवासाला सुरुवात झाली. लग्न झाल्यावर घरातील जबाबदारी पार पाडत मौर्यन डान्स अँकडमी स्थापना करुन त्या माध्यमातुन लहान पासुन ते मोठ्या वयोगटा तील कलाकारांना शिकवण्यासाठी संधी मिळत गेली या अँकडमी मार्फत अनेक कलाकार घडत आहे. हा प्रवास सुरु असतांना झाडीपट्टी रंगभुमीत सुप्रसिध्द कलाकारांन सोबत सलग सात- आठ वर्ष जवळ पास पंन्नास नाटकात वेग वेगळ्या भुमिका केल्या यात गद्दार,भाकर,एकचं प्याला आशा नाटकात देखील स्व:ताची ओळख निर्माण केली व लावणी गाऊन नुत्य देखील केले. ती फुलराणी या नाटकात प्रथम रोख बक्षीस देखील मिळवले नाटकतील मंजुळा हे कँरेक्टर आयुषातंला अविस्मणीय क्षणं ठरला यामुळे नुत्य व नाटकांचा प्रवास सुरु झाला शिल्पाची शून्यातुन सुरुवात झाली जवळ पुरेसे पैसे नसे पण काम करण्याची जिद्द होते आशा परीस्थीतुन नाद घुगंराचा या नावाने लावणीचा फड तयार केला यात पंचवीस आपसरा चा शो लावणे विविध स्पर्धा अयोजित केल्या विर्दभ डान्स स्पर्धा,वेशभुषा स्पर्धा घेऊन हौशी कलावंतांना व्यासपीठ तयार करुन दिले सोशल फ्लॅटफर्म वर देखील शिल्पा शाहीर नावाने युटुब चँईनला प्रतिसाद मिळतांना दिसतो विडा इशकाचा लावणीने देखील नाव लौकिक मिळवंले फेसबुक व इन्स्टाच्या माध्यमातुन आपली कला सादर करण्याचा प्रयत्न चालु आहे अशी हि शिल्पा शाहीर तीला कलावंत विचार मंच या मोठ्या संस्थेने देखील नुत्यांगणा क्षेञातील पुरस्काराने सन्मानित झालेली आहेत.आणी असे विविध पुरस्कारने देखील सन्मानित झालेली आहे कमल फिल्म प्रोडक्शन या मोठ्या निर्मीती संस्थेने देखील सिनेमात काम करण्याची संधी दिली आहे आशी चर्चा होतांना दिसत आहे एका कलाकाराला काय? हवे तर तिच्या पाठीशी तुम्हा सर्वांची साथ आणी अशिर्वाद
लावण्यावंती शिल्पा शाहीर नागपुरकर यांचा
संघर्ष जितका मोठा, तितके यश अधिक अर्थपूर्ण” या विचाराचा प्रत्यय त्यांच्या वीस वर्षांच्या वाटचालीतून येतो. परिस्थिती कोणतीही असो, आपल्या कलेवर विश्वास ठेवून पुढे जात राहणे हीच खरी कलाकाराची ओळख असते. या प्रवासात मिळालेले अनुभव हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैभव आहे.
वीस वर्षे सातत्याने कलेशी जोडलेले राहणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या दोन दशकांत त्यांनी अनुभवलेले सुख-दुःख, मिळवलेली माणसे, रसिकांचे प्रेम आणि प्रत्येक टप्प्यावर केलेली मेहनत ही त्यांच्या आयुष्याची अमूल्य शिदोरी आहे.
आज मागे वळुन पाहातांना संघर्षच्या त्या दिवसाकडे पाहण्याची दुष्टी ही बदलते
ज्या आडचणी कधी काळी पर्वता सारख्या वाटल्या त्याच आडचणी आज यशाची पाया भरणी करणार्या ठरल्या आहेत म्हणुन वीस वर्षाचा प्रवास केवळ एका कलाकाराची काहानी नसुन तर स्वप्न पाहाणार्या प्रत्येक कलाकारांची कहाणी आहे आणी ते पुर्ण करण्यासाठी सातत्याने झगडणार्या प्रत्येक व्यक्ती साठी प्रेरणादायी संदेश आहे.
शिल्पा शाहीर नागपुरकर यांच्या संघर्षमय वीस वर्षाच्या कला प्रवासाला लेखक सुनील मोंढे सर नाशिक यांच्या कडुन मनपुर्वक सलाम पुढील वाटचालीतही त्यांच्या कलेला नवे क्षितिज मिळे,रसिकांचे प्रेम आणी आशीर्वाद सदैव लाभो त्याच्या कोतुकाचा व कर्तुत्वाचा सुगंध आधिक आधिक दुरवर पोहोचो हिच मनपूर्वक सुभेच्छा..
*लेखक*
*मा.श्री.सुनील मोंढे सर नाशिक*
मो.८२०८७७८८६६
८२३७६६१६७०
------
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी -- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments