सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे व्यायामशाळा इमारतीचे भूमिपूजन ---




दिलीप शिंदे 
सोयगाव,दि.७ -- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या विशेष घटक योजनेअंतर्गत (२०२५-२६) गलवाडा येथे व्यायामशाळा इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा दि.०७ रविवारी उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे व रोहित काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

 यावेळी दीपक देशमुख यांनी व्यायामशाळेच्या उभारणीमागील उद्देश व गावातील युवकांना होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. सुशीलाबाई इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास शेषराव पाटील, किरण इंगळे, सचिन इंगळे, श्रीराम जाधव, रुपचंद सरोदे, नंदाराम औरंगे, नामदेव जाधव, मयूर मनगटे, निलेश गाढेकर, संतोष बिऱ्हारे, रवी मंडवे, दिनेश माजाटे, गणेश देशमुख, बापू इंगळे, प्रताप सुरवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments