दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४-- गणेश चतुर्थी निमित्त सोयगाव येथील पोलिस ठाण्यास अंजनाई गोशाळेकडून पर्यावरण पुरक गोमय गणेश मूर्ती सोमवारी भेट देण्यात आली.
क्रांती जनहित बहुउद्देशीय संस्था आमखेडा संचलित अंजनाई गोशाळा निर्मित गोमय गणेशमूर्ती सोयगाव पोलिस ठाण्याचे सपोनी दिनकर गोरे यांना संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांच्या देण्यात आली. सपोनी दिनकर गोरे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करीत प्रोत्साहन दिले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे,संचालक अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर,फौजदार गजानन आरेकर, गजानन दांडगे, कुणाल जाधव,शांताराम सपकाळ,अजय कोळी आदी उपस्थित होते.
0 Comments