दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४-- सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित असलेला सातबारा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने साखर तुला करण्यात आली. दरम्यान सावळदबारा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्याशी संबंधित प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्यामुळे जमीन व्यवहार, कर्जप्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती.या प्रश्नाची दखल घेत इद्रीस मुलतानी यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा सातबारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने सुमारे ४०० शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मिळाल्याने सावळदबारा येथे इद्रीस मुलतानी यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने साखर तुलेसह सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना लाल फेटा बांधण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराज चौकातून इद्रीस मुलतानी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड,जयप्रकाश चव्हाण,गुलाबराव कोलते, गणेश लोखंडे ,नारायण कोलते,प्रमोद पाटील ,कैलास शेळके,प्रभाकर बंडे,मनोज बुढाळ विनोद टिकारे यांच्यासह सावळदबारा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments