बालगोपाळांचा अनोखा गणेशोत्सव: निसर्गप्रती कर्तव्य सोबत छोट्या गणरायाची स्थापना



लोणी,प्रतिनिधी :- ( रूपाली भालेराव )
आजच्या धकाधकीच्या युगात आणि आधुनिकतेच्या काळात सण-उत्सवांचे स्वरूप वेगाने बदलत चालले आहे. मात्र, या बदलत्या प्रवाहातही काही बालगोपाळांनी आपल्या निष्पाप आणि साध्या कृतीतून भक्तीची खरी परिभाषा समाजासमोर उभी केली आहे.

 राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बाळासाहेब नगर येथील स्वराज्य ज्ञानेश्वर साबळे व त्याचे बाल सवंगडी सर्वांनी मिळून चिमुकल्या हातांनी तयार केलेला शाडू मातीचा छोटासा गणपती बाप्पाची घरात स्थापना केली . कुठलाही गाजावाजा नाही, पैशांची अनावश्यक उधळपट्टी नाही आणि डिजेचा कर्णकर्कश आवाजही नाही, अशा अत्यंत साध्या आणि मंगलमय वातावरणात बाल गोपाळांची आणखी श्रद्धा दिसून आले आहे .मनात असली की भक्तीसाठी कोणत्याही दिखाव्याची किंवा मोठ्या प्रसिद्धीची गरज नसते, हेच या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. सध्या सुरू असणाऱ्या डीजे च्या आवाजात असे काही ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असताना पारंपारिक वाद्यांचा आजूबाजूच्या परिसरांमध्ये स्वीकार केला जातो. तसेच वरून राजाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून अनेक अनावश्यक खर्च टाळून गणपती बाप्पाची मनोभावे श्रद्धा कशी करावी हे या छोट्या कडून शिकण्यासारखे आहेत
आजकाल गणेशोत्सव म्हटले की, अवाढव्य रोषणाई, हाय-फाय साऊंड सिस्टीम आणि हजारो-लाखोंचा खर्च याकडे अनेकांचा कल असतो. याउलट, या सुसंस्कृत बालगोपाळांनी या सर्व गोष्टींना फाटा देत निसर्गाप्रती आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यांनी शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती स्वतःच्या कोमल हातांनी साकारली. त्यानंतर या लाडक्या बाप्पाला स्वतःच्या कल्पकतेने रंगवून अत्यंत सुंदर व आकर्षक सजावट केली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत घरच्या घरी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा त्यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असाच आहे. 
आपल्या सवंगडी मित्रांना एकत्र करून या बालमित्रांनी घरातच एक छोटीखानी गणेशोत्सव मंडळी तयार केली. मोठ्या श्रद्धाभावाने आणि उत्सवाच्या आनंदात लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमात या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आणि भक्तीभाव पाहून उपस्थित असणाऱ्या मोठ्यांच्याही मनाला कमालीचे समाधान मिळत होते. दिखाव्याच्या आणि चंगळवादाच्या युगात लहान मुलांनी दिलेला हा संदेश मोठ्यांनाही अंतर्मुख करणारा आहे.
श्रद्धा ही पैशांच्या जोरावर किंवा दिखाऊपणावर अवलंबून नसते, तर ती मनापासून आणि निस्वार्थी असावी लागते, हा अमूल्य संदेश या बालगोपाळांनी संपूर्ण समाजाला दिला आहे. प्रदूषणाला आळा घालत, पर्यावरणाची काळजी घेत आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने घरच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांचा हा मार्ग सर्वांसाठीच अनुकरणीय आहे. या चिमुकल्यांकडून मोठ्यांनीही साधेपणा, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि निखळ भक्ती यांचा आदर्श घेण्याची आज नितांत गरज आहे. नेहमीच आपण छोट्या मुलांना अनेक गोष्टी शिकवत असतो परंतु कधीतरी त्यांच्याकडूनही आपल्याला बरेच शिकायला मिळते असे मानायला काहीच हरकत नाही

 सत्तेचा महासंग्राम -
 प्रतिनिधी -- रूपाली भालेराव.

Post a Comment

0 Comments