सोयगाव येथे माहिती अधिकार कायदा जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१४-सोयगाव येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेच्या कार्यालयात माहिती अधिकार कायदा जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय विकास संस्थेचे चेअरमन शेख रशीद हे होते तर प्रमुख पाहुणे भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शेख गुलाब यांची प्रमुख उपस्थिती होती.

माहिती अधिकार २००५ कायद्यानुसार पंचायत समिती, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय,वनविभाग, सामाजिक वनीकरण आदींसह तालुक्यातील शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांच्याकडे माहिती मागितल्यास कायद्याच्या नियमाप्रमाणे माहिती मिळत नाही. अपिलीय अधिकारी कायद्याची गरिमा न बाळगता कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून निकाल देत असल्याने अपिलीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समिती चे सहाय्यक गट विकास अधिकारी असताना पंचायत समितीचा विस्तार (पंचायत) अधिकारी हा अपिलाची सुनावणी घेऊन कायद्याचा भंग करीत असून अशा कर्मचाऱ्यांवर माहिती अधिकार कायदा कलम १८ व कलम २० नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे शेख गुलाब यांनी सांगितले ते जनजागृती कार्यशाळेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना बोलत होते.सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास, नागरी सुविधा जनसामान्य पर्यंत पोहचावे,कोणावरही अन्याय होत असेल तर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आर टी आय कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान
या कार्यशाळेत माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज कसा करावा, कोणत्या कार्यालयाकडे माहिती मागावी, माहिती न मिळाल्यास प्रथम व द्वितीय अपीलाची प्रक्रिया कशी करावी, तसेच माहिती अधिकाराचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्व शासकीय कार्यालयांनी दि.२८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास संदीप इंगळे, दिलीप शिंदे, ईश्वर इंगळे, विजय पगारे, शेख सुलेमान,वाल्मीक चव्हाण, अशोक ढगे, शेख सुलेमान, ज्ञानेश्वर गाडेकर व विजय भारवाड, पवन लाठे,भागवत दणके आदीसह माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments