पावसाने ओढ दिली, विजेचा खेळखंडोबा, शेतकरी हवालदिल



 शिर्डी ( प्रतिनिधी)- सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने विहीर, बोअरवेलवर पिके जगवण्याची वेळ आली आहे. पण नेमक्या याच वेळी महावितरणने ग्रामीण भागात विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे.

 त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. विहिरीत पाणी असूनही मोटर चालवता येत नाही, पिके करपत आहे. रात्री अपरात्री लाईट येते, बिबट्या आणि सापाच्या भीतीने शेतात जाणे धोक्याचे झाले आहे.विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. लो- व्होल्टेजमुळे पंखा सुद्धा फिरत नाही, मेणबत्तीवर अभ्यास करावा लागत आहे.
राज्यात विजेची अचानक मागणी वाढल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कृषी आणि गावठाण फीडरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करावा लागतो, असं मोघम स्पष्टीकरण महावितरण देत आहे 
 प्रत्यक्षात राज्याचे मुख्यमंत्री तसेच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरवाडी येथील सदगूरू गंगागीरी महाराज हरिनाम सप्ताहात शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याचे आदेश दिले असताना महावितरण असे उडवाउडवीचे उत्तर देत आहे. तरी रात्रीचं लोडशेडिंग बंद करून दिवसा किमान 8 तास सलग वीज द्यावी,लोडशेडिंगचं वेळापत्रक व्हॉट्सॲपवर नाही तर गावात दवंडी देऊन कळवावं, सिंगल फेजचा व्होल्टेज वाढवावा. अशा मागण्या शेतकरी वर्गातून होत असून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही ‌या महावितरण आणि राज्याच्या ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारचा निषेध करण्यात येत असून त्वरित या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर शिवसेना अ,नगर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहता शिवसेनाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments