लोहगाव (वार्ताहर): महात्मा गांधी संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देत आकर्षक गणपतीची मूर्ती स्वतः साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक देशी माती आणि साहित्याचा वापर करून गणपतीची मूर्ती तयार केली.
विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने गणपतीची मूर्ती तयार केली. मूर्ती निर्मितीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी विविध कलाकौशल्यांचा उपयोग केला. या उपक्रमाला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी संकुलाचे प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, विभागप्रमुख डॉ. शरद दुधाट यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक संजय ठाकरे, माधुरी वडघुले, संगीता उगले, प्रफुल्ल नव्हाळे, विजयश्री कदम, सुजाता ठाकरे, नंदादेवी बैसाणे, कमल थिटे, दीपिका आंबेकर, शैलेजा सातपुते, प्रमिला पंडोरे, सुवर्णा भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे नियोजन सहशालेय उपक्रम प्रमुख विलास गभाले, संपत बगाड, पल्लवी कुदळ यांनी केले, तर कला शिक्षिका मीनाक्षी गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना कलात्मक मार्गदर्शन केले.
0 Comments