जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धा : स्तवन सतिश भोसले हस्ताक्षर स्पर्धेत राहुरी तालुक्यात तृतीय क्रमांक



 लोणी प्रतिनिधी / रूपाली भालेराव  
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर ता. राहाता प्रवरा कलाध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धे अंतर्गत रंगभरण स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घेतला होता. 
इयत्ता चौथीतील विद्यार्थी स्तवन सतिश भोसले याने हस्ताक्षर स्पर्धेत राहुरी तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.लेखनातील सातत्य, जिद्द आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. सर्व स्तरातून स्तवन च्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्तवनचे वडील श्री.सतिश भोसले आणि आई सौ.भाग्यश्री भोसले हे शेती करतात आणि त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मनात जिद्द असेल तर परिस्थितीवरही मात करता येते हे स्तवन ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
स्तवन च्या यशाबद्दल राहुरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय कार्ले मॅडम, विस्तार अधिकारी आदरणीय श्रीम. नंदा गवळी मॅडम, तसेच केंद्रप्रमुख आदरणीय श्री. सुरज धनवडे साहेब, केंद्रातील सर्व शिक्षक बंधू ,भगिनी या सर्वांनी अभिनंदन केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. ठाणगे रोहिणी मॅडम,शिक्षिका श्रीम तळोले कविता मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य आणि माजी विद्यार्थी संघाकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विकास नालकर,श्री.बापूसाहेब सरोदे ,श्री .अशोक शिंदे ,सौ.कांचन पठारे,सौ.साबळे रंजना,सौ.पठारे किरण यांच्या हस्ते लेखन साहित्य देऊन त्याचा गौरव करण्यात आला.जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धा आयोजकांचे धन्यवाद.
 सत्तेचा महासंग्राम-
 प्रतिनिधी- रूपाली भालेराव 
 सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर

Post a Comment

0 Comments