शिर्डी येथे माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न



बाभळेश्वर (वार्ताहर) 
माळी समाज विकास संस्था वधू-वर सूचक केन्द्र पुणे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा निसर्ग रिसॉर्ट, , शिर्डी, अहिल्यानगर येथे संपन्न झाला सदर मेळावा माजी नगराध्यक्ष डॉ .के. वाय. गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे गोरक्षनाथ गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .   

   या वधू वर परिचय मेळाव्यासाठी ९३ मुले व ३७ मुलींनी सहभाग नोंदवला. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, संभाजीनगर, बीड, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नाशिक, ठाणे येथून वधू वर आले होते. आलेल्या वधू-वर उमेदवारांनी आपला परिचय करून देत, आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा यावर आपले मत सांगितले. यावेळी आधार फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले समता परिषदेचे राहाता तालुका सरचिटणीस संजय इनामके यांचा सत्कार शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
 पत्रकार    अशोकराव गाडेकर, सुभाषराव गायकवाड, समता परिषदेचे राहाता तालुका अध्यक्ष किशोरराव बोरावके, उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे ,भामरे नाना, प्रभाकर बोरावके, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन दिनार कुदळे ज्योती क्रांती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ हजारे, मच्छिंद्र गुलदगड, नानासाहेब गाडेकर, शंकरशेठ नेवसे, बाळासाहेब ताजणे, भगवान गाडेकर, विलासराव टिळेकर,* *सार्वमतचे राहाता तालुका प्रतिनिधी महेंद्र जेजुरकर, राजेंद्र इनामके सर ,सदानंद ताम्हाणे, प्रभाकर गाडेकर, हनुमंत जगताप, संजय गाडेकर* आदी उपस्थित होते.
 हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सुधाकर गिलचे, सुनंदाताई गिरमे, हेमाताई पुंड, संजय झगडे, सुरेश दरवडे, नितीन ताठे, अरुणाताई गिलचे, रोहीत टिळेकर, गोरक्षनाथ जगताप, प्रकाश शिंदे आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर, सूत्रसंचालन सचिव पांडुरंग गाडेकर तर आभारप्रदर्शन संजय इनामके यांनी केले.

Post a Comment

0 Comments