बाभळेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात



बाभळेश्वर (वार्ताहर ) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मंगळवार दि. १ सप्टेंबर  रोजी सुरुवात झाली आहे. सप्ताह आरंभ १ सप्टेंबर ते  सांगता ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
  दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ते ६ काकडा व भजन . पारायण सकाळी ७ ते ११,  गाथा भजन दुपारी ३ ते ५ हरिपाठ संध्याकाळी ५ ते ६ , जाहीर हरिकीर्तन रात्री ७ ते ९ या कालावधीत होणार आहे व त्यानंतर आमटी भाकरीचा  महाप्रसाद रात्री ९ ते १०  वेळेत होईल   
 दैनंदिन कीर्तन कार्यक्रमात  मंगळवार दि १ ह भ प श्रावण महाराज जाधव सराला बेट, बुधवार दि. २  ह भ प विजय महाराज गुंजाळ सादतपूर, गुरुवार दि. ३ ह भ प नीलकंठ महाराज रायकर कर्जत, शुक्रवार दि. ४ ह भ प गंगाराम महाराज थोरे  गोयेगावकर एकनाथी भारुडाचा कार्यक्रम, शनिवार दि .५ ह भ प संतोष महाराज बढेकर मंचर,   रविवार दि. ६ ह भ प महेश महाराज खाटेकर राहुरी, सोमवार दि आहे ७  भ प चि. साई महाराज म्हस्के सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुल बाभळेश्वर तसेच मंगळवार दि .८ महंत श्री उत्तमराव महाराज गाडे अगेरे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे  त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बाभळेश्वर तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती सप्ताह कमिटी, ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments