गंगापूर व रत्नपूर तालुक्यातील शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न, सोयगाव तालुक्यात शिक्षकांचा काळ्या फिती लावून निषेध--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१५-- गंगापूर व रत्नपूर तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींची वेतनवाढ बंद करण्याच्या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ सोयगाव तालुक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.शिक्षकांच्या वेतनवाढीबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या हक्कांवर गदा आणणारा व आर्थिक नुकसान करणारा हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी सोयगाव तालुक्यातील शिक्षकांनी केली.या निषेध आंदोलनात तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करून वेतनवाढ पूर्ववत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिक्षकांच्या हक्काची वेतनवाढ बंद करणे अन्यायकारक असून, शासनाने तातडीने हा निर्णय रद्द करून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.या आंदोलनातून शिक्षकांच्या एकजुटीचे दर्शन घडले असून, मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments