महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न*(माजी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती व आर्थिक योगदान)



लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून विनम्र अभिवादनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत बँकेचे व्हाईस चेअरमन, प्राचार्य दिलीप डहाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे प्रमुख, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के हे होते. 
या सोहळ्यात उपस्थित प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते व रयत बँकेचे संचालक प्रशांत खामकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की: विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी मोठी स्वप्ने बघणे ही काळाची गरज असून बहुजनांच्या मुलांमध्ये स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे.
कैलास कडलग: (उपविभागीय अधिकारी, चांदवड - माजी विद्यार्थी): "आपण ज्या मातीत घडलो, त्या मातीचे आपण देणे लागतो," अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार अंगी बाळगून आपली योग्य जडणघडण करण्याचे आवाहन केले.
डॉ. प्रसाद उंबरकर (प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट - माजी विद्यार्थी): यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील विविध आव्हानांवर मात करून यश कसे संपादन करावे, याचे मार्गदर्शन केले.
याशिवाय सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, रमेशभाऊ शिंदे, प्रसिद्ध उद्योजक तथा माजी विद्यार्थी प्रशांत बुद्धिवंत आणि माजी प्राचार्य मधुकर अनाप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, शाळा व परिसराच्या विकासात हातभार लावणारे आणि संस्थेला आर्थिक बळ देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले. विद्यालयासाठी आर्थिक योगदान देणारे माजी प्राचार्य विनायक मेथवडे, माजी प्राचार्य अंगद काकडे, ज्ञानदेव माळी, रमेश निकाळे तर अभिवादन स्थळी ब्रांझ धातूचा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक योगदान देणारे माजी प्राचार्य मधुकर अनाप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हॉर्टी विषयाचे शिक्षक शिवाजी काळे व उभयतांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शाखेच्या वतीने व रयत बँकेच्यावतीने व्हाईस चेअरमन दिलीप डहाळे व संचालक प्रशांत खामकर यांच्या हस्ते चांदीचे नाणे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अमृतपर्व व कन्या विभागाच्या अमृतवेल या शाखा पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. धनंजय भालेराव, प्रतीक भुजबळ व तनुजा भालेराव या विद्यार्थ्यासह लता टावरे, अनिल गोलवड, देवेश आहेर, सुजाता ठाकरे व भारती भुसारे यांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गायत्री थेटे व प्रिया ठोंबरे या विद्यार्थ्यांना शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शिष्यवृत्तीसह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थी प्रशांत बुद्धिवंत यांनी समाज कल्याण वसतिगृहासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र तर नाशिक येथील कपिल हांडे यांनी या वसतिगृहासाठी स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालय उभारून देण्याचे घोषित केले. प्रवीण कुमार सचदेव यांच्यातर्फे वीस विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, संगीता उगले, रेणुका वर्पे व प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी मानले. या सोहळ्यास कमलताई म्हस्के, राजश्री गागरे, बाबासाहेब नाईकवाडी, रमेश शिंदे, माजी प्राचार्य भिमराव आंधळे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, दगडू खर्डे, रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी, ज्योती आहेर, दत्तात्रय निर्मळ, दत्तात्रय चौधरी, नानासाहेब गांगड, नारायण जाधव, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय डुबे, संजय ठाकरे, संजय इनामके, बाबासाहेब अंत्रे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments