पावसा अभावी संकटात आलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने कोणतीही अट व शर्ती न टाकता कालव्याचे सरसकट पाणी द्यावे--शिवसेना(उबाठा )तालुकाप्रमुख संदीप विघे

शिर्डी ( प्रतिनिधी)-
राहाता तालुक्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. सध्या गोदावरी कालव्याला पाणी चालू आहे. या कालव्यातून शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता, अगोदरची कोणतीही थकबाकी, किंवा पट्टी भरलेली असो किंवा नसो तरी त्या शेतकऱ्याला सरसकट पाणी द्यावे. शेतकरी मोठा आर्थिक संकटात असून पिके वाचवण्यासाठी पाण्याची मोठी गरज आहे.


 तेव्हा सरसकट शेतकऱ्यांना या कालव्यांमधून पाणी द्यावे. अशी मागणी राहाता शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,राहता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पाट पाणी मिळावे.सध्या राहता व आजुबाजुच्या सर्वच भागात पावसाने उघड घेतली आहे..दुपारी सर्व पिके ऊन धरत आहे. सर्वच पिके आत्ता वाढीसाठी व फुलधारणेच्या स्टेप मध्ये आहेत. पण पाऊस नसल्यामुळे पिके जाण्याचा धोका आहे.सध्या या भागात पाटाला पाणी चालू आहे. वरच्या भागात पाऊस होत असल्यामुळे काही नद्यांनाही पाणी चालू आहे. हे अतिरिक्त पाणी सुरू आहे.तरी राहता तालुक्यातील व आजूबाजूच्या  
 सर्व तालुक्यातील म्हणजेच जवळपास ज्या ठिकाणी पाट पाण्याची व्यवस्था आहे .अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी चाऱ्या सोडण्यात याव्यात.सोयाबिन, मका ,कपाशी, ऊस यांना पाटाचे मिळाले पाहिजे. कोणतेही अट व शर्ती न लावता यावर्षी तरी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी द्यावे. कारण पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती मोठी बिकट होत आहे. अशी मागणी संदीप रमेश विघे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments