टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा रजि. नं. २६३/२०२६ मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे प्रवीण वैरागर व पीडित कुटूंबाने उपोषण सुरु केले आहे
उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे अद्याप मात्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने उपोषण स्थळे भेट दिले नाही .
पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव, धमकी अथवा दहशत निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
तसेच आरोपींना आश्रय, मदत किंवा संरक्षण देणाऱ्या व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी. कोणत्याही राजकीय अथवा स्थानिक दबावाला बळी न पडता प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चुकीचा तपास सादर करून कारवाईस विलंब करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. सरपंच व पोलीस पाटील यांनी दिशाभूल करून पदाचा गैरवापर केला असल्यास त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तातडीने तपास पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी भूमिका माजी सैनिक प्रवीण वैरागर व पीडित कुटुंबीयांनी घेतली आहे.
“पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments