चांदमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील सहाशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप-



दिलीप शिंदे सोयगाव 
सोयगाव दि.१६- चांदमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील जिल्हा परिषद शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना दि.१६ रविवारी स्कूल बॅग वाटप करण्यात आले .

 दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी जिल्हा बँकेचे संचालक आबासाहेब (प्रभाकर) काळे, मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे, पंचायत समिती सदस्या सविताताई गव्हांडे, वैभवीताई पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन.या कार्यक्रमास सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी दिनकर गोरे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम वातावरण तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळाच गुणकारी ठरतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणा चे बाळकडू द्या व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई वडिलांचे स्वप्न साकार करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी रविवारी निंबायती येथे केले. निंबायती येथे रविवारी चांदमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. 
यावेळी बनोटीचे माजी सरपंच सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान जिल्हा बँकेवर सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले आबासाहेब (प्रभाकर) काळे व मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचा शाळेचे शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय काळे,सरपंच गणेश माळी, विजय चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले दरम्यान निंबायती येथील घोसला शाळेत हा कार्यक्रम झाला. गणेश माळी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आभार जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी मानले..

Post a Comment

0 Comments