अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब निवृत्ती चव्हाण (पुणतांबा) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
तसे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गोरखनाथ वर्पे यांनी त्यांना नुकतेच आ. रोहित पवार यांच्या हस्ते दिले आहे. या नियुक्तीपत्रात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, आ. रोहित दादा पवार व खा. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदराव पवार पक्षाला व पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी होईल या हेतूने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले असून या पत्रातून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब निवृत्ती चव्हाण यांनी शेतकरी व शेतमजुरांसाठी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या किसान सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावरही त्यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आलेली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा अशोक मोरे यांनीही त्यांची सन 2024 ला नियुक्ती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या अहिल्या नगर जिल्हा सरचिटणीस या पदांवर बाळासाहेब निवृत्ती चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे. बाळासाहेब निवृत्ती चव्हाण हे पुणतांबा येथील रहिवाशी असून अनेक वर्षापासून ते सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी राहता तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सलग नऊ वर्ष यापूर्वी काम केले आहे. राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसवरही त्यांनी सलग तीन वर्ष काम केले आहे. राष्ट्र किसान सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. खंडकरी शेतकरी चळवळीत सक्रिय राहून शेतकऱ्यांना खंडाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न व योगदान आहे. शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून पुणतांबा येथे झालेल्या राज्यस्तरीय आंदोलनात त्यांनी सक्रिय राहून पस्तीस हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता. रेल्वे पुणतांबा जंक्शन स्टेशन असूनही येथे अनेक रेल्वे थांबत नाही त्यामुळे येथे रेल्वे रोको आंदोलन झाले त्यात ते सक्रिय होते. त्यामुळे येथे आणखी तीन रेल्वे आता थांबत आहेत. शिर्डीत व्यापाऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांना त्यावेळी नाशिक कारागृहात पंधरा दिवस राहावे लागले होते. असे सातत्याने सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे बाळासाहेब निवृत्ती चव्हाण यांची राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपली जिल्हा सरचिटणीस म्हणून जी नियुक्ती केली व जबाबदारी टाकली ती नक्कीच आपण इमानदारीने, प्रामाणिकपणे व समाजाचे आणि पक्षाचे निष्ठेने काम करून ही जबाबदारी नक्कीच सार्थ ठरवू असे आश्वासन देत त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे,व सर्व मान्यवरांचे आणि पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आहेत.
0 Comments