श्री साईचरणी २१ लाख रुपये किंमतीची सोन्याची नाणी अर्पण!



शिर्डी (प्रतिनिधी)-
 श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. दररोज हजारो साईभक्त व सण उत्सवाला लाखोच्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डीत येत असतात.हे साई भक्त साई दर्शननंतर भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात. अशाच प्रकारे आज गुरुवर 13 ऑगस्ट 2026 रोजी एका साईभक्ताने २१ लाख ०९ हजार ६९१ रुपये किंमतीचे, १३६ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम वजनाचे ०७ नग सोन्याचे नाणे श्री साईचरणी अर्पण केले.


ही देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त यांचा सत्कार केला.
सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Post a Comment

0 Comments