टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एकल महिलांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाचा झेंडा फडकण्याचा मान मिळणार आहे ,
टाकळीभान मध्ये विविध ठिकाणी पुढील प्रमाणे एकल महिलांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा, झेंडा फडकवण्याचा मान मिळणार आहे, टाकळीभान ग्रामपंचायत - मंगल रामकृष्ण जाधव - सुनिता बापुसाहेब चौधरी, तसेच मराठीशाळा - शकुंतला राऊसाहेब पटारे - रंजना राऊसाहेब पवार, त्याचप्रमाणे लक्ष्मीवाडी शाळा - मंगल डॅनियल खरात - आशाबाई रामभाऊ सटाले,तर बनकर वस्ती शाळा - अनिता बाबासाहेब लोखंडे - अश्विनी रवींद्र म्हस्के, व
दाभाडे वस्ती शाळा- सोनाली सागर आसने { लांडगे } - राणी जॉन रणनवरे, अशा एकल महिलांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने एकल महिलांचा टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे, ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले जात आहे,
0 Comments