लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गलवाडा येथे प्रेरणादायी कार्यक्रम---



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०१-- सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. समाजसेविका सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. तसेच त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव आणि प्रेरणादायी कार्य यावर लहान मुलांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.या प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक आनंदा इंगळे, मिलिंद सोनवणे, गोपाल इंगळे, गोपाल मंडवे, विक्रम इंगळे, दिनेश जाधव, उत्तम कांबळे, सुशील कांबळे, भारत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय औरंगे, राहुल इंगळे, संजय कुनगर, अमोल दाभाडे,अनिल इंगळे,सुनिल सैदाणे,जीवन पाटील,भारत इंगळे,गोविंदा सोनवणे, सागर बिऱ्हारे, एकनाथ खलसे, राहुल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments