पक्ष संघटना आणखी मजबूत व्हावी यासाठी शिवसेनेची गाव तिथे शाखा व प्रत्येक कुटुंबात शिवसैनिक उभा करावा----शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांचे बैठकीत आवाहान!

शिर्डी ( प्रतिनिधी)-
आगामी काळात उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या‌ मार्गदर्शनाखाली पक्षाला महाराष्ट्रात मोठी संधी मिळणार असून मात्र त्यासाठी पक्ष संघटना आणखी मजबूत करावी. गाव तेथे शिवसेनेची शाखा व प्रत्येक कुटुंबात शिवसैनिक उभा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जिद्दीने कामाला लागावे. आपण प्रत्येक‌ शिवसेना पदाधिकारी व प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. असे मत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शिर्डी विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांतजी शिंदे यांनी व्यक्त केले .
राहता तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक नुकतीच सावळीविहीर फाटा येथे संपर्क प्रमुख सूर्यकांतजी शिंदे, जिल्हा प्रमुख सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख शिवकुमार जंगम, नाना बावके. जिल्हा संघटक अमोल बोराडे, तालुकाप्रमुख संदीप विघे आदीच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी प्रकाश गायकवाड, शिर्डी शहर प्रमुख नाना सावंत्रे, राहता शहर प्रमुख सागर लुटे, पुणतांबा शहर प्रमुख महेश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते प्रभाकर डांगे बाबासाहेब शिंदे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष किरण जपे , डॉ .शरद भदे, शहर प्रमुख दिनेश आरणे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी संपर्कप्रमुख सूर्यकांतजी शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की,
 शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा पळपुटेपणा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वासघात असून आगामी निवडणुकीत शिर्डी लोकसभेसह पक्षांतर केलेल्या सहाही लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांनाच मतदार विजयी करतील व गद्दारांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त केला, आगामी काळात पक्षाला महाराष्ट्रात मोठी संधी मिळेल , त्यासाठी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी गावतेथे शिवसेना शाखा व प्रत्येक कुटुंबात शिवसैनिक उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, या बैठकीत त्यांनी‌ खासदारांच्या पक्षांतरा नंतर‌ येथे येऊन या बैठकीत उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसैनिकांचे प्रश्न जाणून घेतले.व ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही दिली. शिवसैनिकांनी तळागळात जाऊन काम करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी तालुकाप्रमुख संदीप विघे यांनी सांगितले की, शिवसेना तालुक्यात वाढवण्यासाठी गावोगाव व वाड्या वस्तीवर जाऊन नवे तसेच जुने जेष्ठ जाणकार शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेऊन गावागावात शिवसेनेचे फलक लावून तसेच प्रत्येक गावातील समस्या, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व तरुणांचे संघटन करण्याकडे अधिक भर दिला जाणार असून तरुण व जुन्या जेष्ठ शिवसैनिकांची फळी पुन्हा तालुक्यात उभी करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ही शिवसेना मोठ्या ताकतीनिशी लढणार आहे. असे यावेळी सांगितले. यावेळी अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. या बैठकीमध्ये राहता
 तालुका स्तरीय शिवसेना पदाधिकारी‌ यांच्या निवडी जाहीर होऊन नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना संपर्कप्रमुख सूर्यकांत जी शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले, व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीत प्रथम संपर्कप्रमुख सूर्यकांतजी शिंदे यांचा तालुकाप्रमुख संदीप विघे यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार करत स्वागत केले.या बैठकीला बाळासाहेब काशिद, शंकर पवार, बाळू गुंजाळ, सदू तळोदे, सुधीर कामठे, सचिन विघे, आदींसह राहता तालुक्यातील गावोगावचे शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments