शिव हेच सत्य, शिव हेच तत्व असून हरिद्वार येथील हरिहर आश्रमातील पारेश्वर महादेव शिवलिंग भक्तांसाठी तर अध्यात्मिक शक्ती शांती आणि कल्याणाचे केंद्रस्थान आहे. हे शिवलिंग श्री पंच दशनाम जुना आखाडा च्या पवित्र परंपरेचे अनमोल दैवत आहे. येथे येऊन श्री पारेश्वर महादेवाचे दर्शन पूजन जलाभिषेक केल्याने नक्कीच शिवकृपा होते. असे श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत व जुना आखाड्याचे संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
मंहत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचा अध्यात्मिक असा हरिद्वार तीर्थयात्रा दौरा सध्या सुरू असून त्यांनी हरिद्वार येथील हरिहर आश्रमात जाऊन श्री पारेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी येथील प्रसिद्ध अशा श्री पारेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची मोठ्या भक्ती भावाने माहिती देताना सांगितले की, येथील श्री पारेश्वर शिवलिंग हे नैसर्गिक पारापासून निर्माण केलेले व सिद्ध केलेले अद्भुत व दैवी शिवलिंग आहे. पारा हा रसायन शास्त्रात अत्यंत पवित्र, तेजस्वी आणि चैतन्यमय धातू मानला जातो. हे शिवलिंग स्वयंसिद्ध जागृत आणि मनोकामना पूर्ण करणारे असून श्री पारेश्वर शिवलिंगाचे नियमित दर्शन व अभिषेक केल्याने मन बुद्धी आणि शरीर शुद्ध व निरोगी राहते तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो, हे शिवलिंग भक्तांसाठी अध्यात्मिक शक्ती शांती आणि कल्याणाचे केंद्रस्थान आहे. येथे या शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील अशांती नष्ट होते. आरोग्य, आयुष्य, यश समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती होते. असे हे पवित्र व प्रसिद्ध असे श्री पारेश्वर शिवलिंग हे हरिद्वार ,(कणखल) येथील श्री पंच दशनाम जुना आखाडा, हरिहर आश्रम, हरिद्वार, (आचार्य गादीस्थान) येथे असून येथे शिवभक्तांनी हरिद्वार येथे आल्यानंतर अवश्य भेट देऊन मनोभावे दर्शन घ्यावे. येथील श्री पारेश्वर महादेवाचे दर्शन म्हणजे जीवनाचे पावन सौभाग्य आहे. असे मंहत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले.
0 Comments