आईच्या स्मृतीला तंत्रज्ञानाची जोड; सावळीविहीरच्या शाळेत प्रिंटर आणि लेकरांच्या स्वप्नांना AI चे पंख ----- माजी सरपंच बाळासाहेब जपे


             
 शिर्डी( प्रतिनिधी )- एका मातेच्या स्मृतीतून एका शाळेच्या भविष्याला आकार मिळाला आणि एकाच व्यासपीठावर माणुसकी आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.साईभक्त कमलेशभाई पटेल यांनी आपल्या मातोश्री कै. गीताबेन राजूभाई पटेल यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीर बु. ला BROTHER कंपनीचा अत्याधुनिक प्रिंटर भेट म्हणून दिला. ही केवळ एक वस्तू नाही, तर आईच्या नावाने शिक्षणाची अखंड सेवा आहे असे प्रतिपादन माजी सरपंच बाळासाहेब जपे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमात प्रिंटर बाबुराव कोते व वैभव कोते यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक बनसोडे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब जपे, संतोष आगलावे, स्कूल कमिटी सदस्य गणेश कापसे, नानासाहेब कदम, राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने कमलेशभाईंचे आभार मानण्यात आले.तर ३६ चिमुकल्या वैज्ञानिकांनी घवघवीत ए-आय परीक्षेत
यश मिळवले. इयत्ता ५ वी ते १० वीच्या या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या नव्या युगात उंच भरारी घेतली. त्यांच्या हातात प्रमाणपत्र आणि एकूण ३,६३६ रुपयांचे बक्षीस देताना अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते यावेळी AI विभाग प्रमुख वाकचौरे सर, सहाय्यक काळेगोरे सर, सौ. डहाळे मॅडम, म्हस्के सर, खेडकर सर, कानडे मॅडम, धीवर, इनामके, लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments