सावळीविहिर फाटा येथे श्री साई मंदिराचा सतरावा वर्धापन दिन 28 व 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी होणार साजरा!

शिर्डी (प्रतिनिधी)- 
राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा येथे असणाऱ्या श्री साई मंदिराचा सतरावा वर्धापन दिन व त्यानिमित्ताने श्री साई चरित्र पारायण सोहळा शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट व शनिवार दिनांक 29 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
राहाता तालुक्यातील सावळीविहिर फाटा येथे साईभक्त दिनकर रामदास गांगुर्डे व सौ. संगीता दिनकर गांगुर्डे तसेच गांगुर्डे परिवार व साई भक्तांनी सुंदर व आकर्षक असे श्री साई मंदिर बांधलेले‌ असून इथे दरवर्षी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षीही या साई मंदिराचा सतरावा वर्धापन दिन दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. येथील श्री साई मंदिरचा सतरावा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी श्री साई सतचरित्र पारायण सुरू होऊन शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी पारायणाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रात्री आठ ते 11 वाजेपर्यंत श्री साईबाबांचे सुमधुर भजन, अभंग आणि भक्ती गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. तसेच महाप्रसादाचाही कार्यक्रम होणार असून या दर्शन पारायण व महाप्रसादासह सर्व धार्मिक कार्यक्रमांचा साई भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त दिनकर रामदास गांगुर्डे व सौ. संगीता दिनकर गांगुर्डे तसेच गांगुर्डे परिवार व साई भक्तांनी एका पत्रिकेद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments