राहाता (तालुका प्रतिनिधी)- गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी 2 सप्टेंबर पर्यंत सात क्रमांकाच्या अर्जाची मुदत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आव्हान अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केले आहे.
पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की यावर्षी लाभक्षेत्रामध्ये अगदी कमी पाऊस झाल्यामुळे विहीर बोरवेल यांना पाणी राहीले नाही. थोड्या पावसावर खरीप पिके पेरले ते आज सुकत आहे सध्या कोठेच पाऊस पडत नाही. तरी शेतकऱ्यांनी सात नबंर फार्म भरावे, जणे करुन कालवे जास्त दिवस चालतील व पिके वाचतील व लाभक्षेत्रातील पुढील काळात किमान पिण्यासाठी व जनवरासाठी पाणी उपलब्ध होईल. असे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे.
तसेच पाणी मागणी अर्ज जास्त शेतकऱ्यांने भरले तर जलसंपदा व पाटबंधारे विभाग यांना शेती साठी आर्वतने करावे लागतात. पंरतू काही शेतकरी पाटबंधारे विभागाने पाणी पटृटी ही तब्बल दहा टक्के वाढवली, शिवाय लाभक्षेत्रातील कनाॅल पासून अडीच किलोमीटरची अट लावल्यामुळे व पाटबंधारे विभागाकडून आर्वतनाचा कालावधी जास्त दिवसाचा ठेवल्यामुळे पिके जळतात या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये असतोंष निर्माण होत चालल्याने काही शेतकरी फार्म भरत नाही तरी पाटबंधारे विभागाने वाढीव पाणी पट्टीचे दर कमी करुन शेती आर्वतन किमान तीस दिवसाचे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे शेळके यांंनी केली आहे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कनाॅल रूंदी केल्यामुळे पुर्वीप्रमाणे किमान चारसे क्यूसेक ने पाणी येईल तरी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांने सात नंबर फार्म भरून मागणी करावी असे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.
0 Comments