नवी दिल्ली येथील साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी 11 लाख 19 हजार रुपये किंमतीचे आकर्षक सोन्याचे ब्रोंच साईचरणी केले अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी)-संपूर्ण विश्वाला सर्वधर्मसमभाव आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या
 श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. दररोज या श्रद्धेपोटी हजारो तर सन उत्सवाला लाखोच्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. साई दर्शनानंतर भाविक साईबाबांच्या झोळीत वेगवेगळ्या स्वरूपात भरभरून दान देत असतात. 

अशाच प्रकारे नवी दिल्‍ली येथील साईभक्त श्री सतीश कुमार चान्ना या साईभक्ताने नारळी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सुमारे ११ लाख १९ हजार रुपये किंमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले हिरे जडीत सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्पण केले‌आहे. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला. यावेळी या साईभक्ताचा परिवार ही उपस्थित होता. यावेळी साईभक्त सतीशकुमार चान्ना यांनी म्हटले की, आपण 19 वर्षापासून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला येतो. साईंची मला व माझ्या परिवारावर मोठी कृपा असून अशीच कृपा कायम राहावी. असे त्यांनी यावेळी सांगितले .

Post a Comment

0 Comments