मानधन सन्मान योजनेच्या अर्ज भरण्यास पंधरा दिवसाची मुदतवाढ द्यावी ...प्रमोद पंडित

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या अर्ज भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी – प्रमोद पंडीत अभिनेता दिग्दर्शक अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्यची मागणी
लोणी,अहिल्यानगर | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या "राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १ जुलै ते ३१ जुलै अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी (Server Busy, Website Jam, Slow Response, Login Issues) निर्माण झाल्यामुळे अनेक पात्र ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंतांना अर्ज सादर करता आले नाहीत.

यामुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ कलाकार या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर प्रमोद पंडीत,यांनी महाराष्ट्र शासनाकडे अर्ज भरण्याची अंतिम मुदत किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे.

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर प्रमोद पंडीत,यांनी सांगितले की, अनेक जिल्ह्यांतून कलाकारांकडून अर्ज भरताना तांत्रिक अडचणींच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करून पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना न्याय मिळावा यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.

प्रमोद पंडीत (अभिनेता दिग्दर्शक)महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव व संचालक यांना निवेदन देऊन "Last Date Extension – 15 Days" जाहीर करण्याची विनंती केली आहे.

मुख्य मागण्या (Key Demands):

Online Application Last Date किमान १५ दिवसांनी वाढविण्यात यावी.

Portal वरील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात.

कोणताही पात्र ज्येष्ठ साहित्यिक किंवा कलाकार केवळ तांत्रिक कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये.

शासनाने मुदतवाढीबाबत अधिकृत आदेश त्वरित प्रसिद्ध करावा.

प्रमोद पंडीत(अभिनेता दिग्दर्शक) अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर

Post a Comment

0 Comments