संगमनेर -- पोलिस तक्रार निवारण दिनानिमित्त संगमनेर प्रवासी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्वाच्या विषयावर चर्चा केली यावेळी शहरातील बसस्थानक परिसरात कायम स्वरुपी पोलिस चौकी सुरू करण्याची प्रमुख मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सोमनाथ वाघचौरे यांनी बस स्थानकात लवकरच पोलिस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पोलिस विभागाने तक्रार निवारण दिनाचे आयोजन केल्याबद्दल संगमनेर प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांचा अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संगमनेर प्रवासी संस्थेचे अध्यक्ष - अनिल भोसले, उपाध्यक्ष -संजय क्षत्रिय, सचिव - कारभारी देव्हारे,खजिनदार - मुरतजा बोहरी,नितीन मोहाले,आदित्य घाटगे,दिलीप गायकवाड,चंद्रकांत चव्हाण,भाऊसाहेब वैद्य, अमित पाटणकर, सुरेश पंजाबी,विवेक मुळे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
0 Comments