न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेत यश.

            


टाकळीभान प्रतिनिधी : बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव विद्यालयाचे इयत्ता सातवी स्कॉलरशिप परीक्षा 2026 परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.कु. अक्षदा सुनील तरकसे 300 पैकी 214 गुण तर कु. अर्णवी दिनकर मुठे 300 पैकी 206 गुण मिळाले. 

तर चि. कृष्णा दत्तात्रय चौधरी यास 300 पैकी 178 गुण मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक काशीद सर व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक सिकची व शालेय व्यवस्थापन समितीचे उप अध्यक्ष संजय मुठे आणि सर्व सदस्य आदींनी अभिनंदन केले. विद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थ्यांवर गावातील सर्व ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

0 Comments