टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या निवडणूक इतिहासामध्ये प्रथमच फेर आरक्षण टाकण्यात आले, बुधवार दिनांक १० जून २०२६ रोजी प्रभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी ज्ञानदेव आघाव यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागीय आरक्षणाची बैठक संपन्न झाली,
या बैठकीमध्ये प्रभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी ज्ञानदेव आघाव यांनी शासन निर्णयाचा कुठलाही अभ्यास न करता व मागील निवडणुकांमध्ये पडलेले, आरक्षण पुन्हा रिपीट केले नविन आरक्षण चक्रानुक्रमे न फिरवता आरक्षण टाकले सदर बैठकीत प्रभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी ज्ञानदेव आघाव यांना शासन निर्णय व नियमावली समजून सांगून ,ही प्रभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी ज्ञानदेव आघाव यांनी आरक्षण टाकून दिले त्यानंतर महसूल प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, .तहसीलदार साहेब तथा निवडणूक अधिकारी मिलिंद वाघ साहेब यांनी टाकळीभान ग्रामपंचायतचे प्रभागीय आरक्षण पाहता एक नाही तर अनेक चुका झाल्याच्या निदर्शनास आले,वरिष्ठांची चर्चा होऊन पुन्हा फेर आरक्षण टाकण्याचे ठरले ,त्यामुळे सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी प्रभागीय अधिकारी दिनकर'जी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, प्रभागीयअधिकारी ठाकरे साहेब यांनी शासन निर्णयाप्रमाणे व चक्रानुक्रमे तसेच ईश्वर चिट्ठीचा वापर करत आरक्षण टाकले ,आरक्षणाबाबत सर्व टाकळीभान ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले,त्यांमुळे कोणीही प्रभाग आरक्षणावर हरकत नोंदवली नाही ,आज प्रभाग आरक्षणाला अंतिम मान्यता देण्यात आली असून, तहसीलदार साहेब तथा निवडणूक अधिकारी मिलिंद वाघ , प्रभागीय अधिकारी दिनकर' ठाकरे साहेब,कामगार तलाठी सौ.रूपाली रामटेके मॅडम तसेच ग्रामविकास अधिकारी भिंगारदे भाऊसाहेब यांचे ग्रामस्थांनी आभार मानले,
0 Comments