शांत ,सुस्वभावी व संघटन कौशल्य असणारे सर्व परिचित व्यक्तिमत्व--राहाता कृ. बा. समितीचे संचालक शांताराम सोपानराव जपे पा. यांना वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातून देण्यात येत आहे हार्दिक शुभेच्छा!

शिर्डी (राजकुमार गडकरी)--
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सावळी विहीर बुद्रुक सोसायटीचे विद्यमान संचालक शांताराम सोपानराव जपे पा. यांचा 26 जुलै 26 रोजी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रांमधून व हितचिंतकांकडून त्यांचे प्रत्यक्ष भेटून भ्रमणध्वनी द्वारे तसेच सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.
    श्री शांताराम जपे पा. हे राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील एक सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावजलेले व्यक्तिमत्व असून अगदी महाविद्यालयीन जीवना पासून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले असून आज पर्यंत त्यांचा राजकीय प्रवासही तितकाच मोठा आहे. कोपरगाव येथे महाविद्यालय शिक्षण घेत असतानाही त्यांनी त्यावेळी महाविद्यालयात होणाऱ्या सीआर, जीएस आदी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतलेला होता. व तेव्हापासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. सावळीविहीर गावामध्ये अमरदीप संघटनेच्या माध्यमातून सर्व युवकांना एकत्र करून एक सामाजिक अशी कार्य करणारी त्या माध्यमातून संघटना उभी केली. अमरदीप युवक संघटनेच्या माध्यमातून गावामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव, तसेच श्री परसराम महाराज यात्रा असो, श्री साई चरित्र पारायण, हरिनाम सप्ताह असो, दिंडी असो त्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग असण्यामागे त्यांचा मोठा हात आहे. शांताराम जपे हे स्वतः सामाजिक क्षेत्रात नेहमी धडपडणारे असे व्यक्तिमत्व असून गावातील कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, धावून येणारे असे शांताराम जपे यांनी सामाजिक कार्य करत असताना नागरिकांच्या आग्रहास्तव प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवली. पहिल्यावेळी त्यांना निवडणुकीत अपयश आले. मात्र त्यानंतर त्यांनी नाराज न होता परत पुढची पंचवार्षिक निवडणूक लढवली व ते विजयी झाले. त्यानंतर मात्र सामाजिक कार्य करत असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी सातत्याने विजयाची भरारी सुरू ठेवली. ते ग्रामपंचायत सदस्य झाले, ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच ही झाले. सोसायटीमध्ये संचालक झाले, आजही ते विद्यमान संचालक आहेत. सोसायटीत व्हा.चेअरमन झाले. त्यानंतर त्यांच्या सामाजिक ,राजकीय कार्याची दखल घेऊन व विखे परिवाराचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील, व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी त्यांना राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून उमेदवारी दिली व ते निवडून आले. सध्या ते राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा मोठा वाटा आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंवा हायस्कूल मध्ये कोणताही कार्यक्रम असला की त्यांची उपस्थिती ही असते. कोणाशीही कधीही भांडण, अरेरावी नाही. अगदी शांतपणे बोलणारे, कोणत्याही संकटात किंवा समस्येचा मार्ग काढणारे, गावातील अनेकांच्या वेगवेगळ्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे , लहांना पासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये मिसळणारे शांताराम जपे पा.हे सावळीविहीर बुद्रुक येथील दिलखुलास असे एक व्यक्तिमत्व असून सावळीविहीर सह परिसरातील गावांमध्येही ते सर्व परिचित आहेत.

 सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही त्यांचा मोठा प्रयत्न व वाटा होता. त्यांच्या शांत व सुस्वभावी पणामुळे विखे परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. संघटन कौशल्य, सामाजिक व राजकीय कार्य, व शांत स्वभाव यामुळे ते गावातही सर्व परिचित असून एक विखे पाटील परिवाराचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून समजले जात आहे. अशा सुस्वभावी व गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असणाऱ्या शांताराम जपे पा‌.यांचा आज 26 जुलै रोजी वाढदिवस असून त्यांना सर्व क्षेत्रांमधून, गावातून प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनीद्वारे व सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त हितचिंतकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक सदिच्छा आहेत. व पुढील आयुष्यासाठी, कार्यासाठी शुभेच्छा आहेत.

Post a Comment

0 Comments