तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शुकशुकाट, शासकीय कार्यालयात कर्मचारी नसतांना देखील ट्यूब कांडी व पंखे सुरूच!---




दिलीप शिंदे 
सोयगाव,दि.२५-- सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात एकही अधिकारी कर्मचारी हजर नसताना ट्यूब लाईट व पंखे सर्रास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार दि.२४ शुक्रवारी उघडकीस आला होता. ते बंद करण्यास कोणीही तसदी घेतली नाही.शासन नेहमीच वीज बचती बाबत सकारात्मक असताना देखील शासकीय कार्यालयातच विजेचा दुरुपयोग केला जात.

 असल्याने अधिकारीच शासनाचे नियम धाब्यावर बसवीत असून जनतेच्या पैशांचा चुराडा केला जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कर्मचारी हजर राहत नाही मात्र ट्यूब कांड्या व पंखे सुरू राहण्याचे नित्याचे झाले आहे. दरम्यान दांडी बहाद्दर कर्मचारी कोणाच्या परवानगीने गैरहजर आहेत याची चौकशीही प्रशासानाडून करण्यात येत नसल्याने सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीतेश चावडा यांचे थेट जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे का असाही प्रश्न तालुक्यातील जनतेकडून केला जात आहे.दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे कार्यालयीन कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही मात्र कार्यालयातील ट्यूब कांड्या,पंखे सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय होत असून जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.काम नसताना शासकीय कार्यालयातील विद्युत उपकरणे सुरू ठेवल्याने सर्व सामान्य जनतेला लोडशेडींग सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.शासकीय कार्यालयांना सरकारने वीज युनिटची मर्यादा घालून द्यावी.व क्षमतेपेक्षा जास्तीचे वीज युनिट जास्त वापर झाल्यास कार्यालयीन प्रमुखाच्या पगारातून ती रक्कम वसूल करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांच्यासह इतर शासकीय कार्यालयाचे प्रमुख अशा प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments