सेवानिवृत्ती बद्दल अनिल गुंजाळ ,भाऊसाहेब जपे व लोंढे यांचा माजी वर्ग मित्रांकडून नुकताच करण्यात आला सत्कार! चांगला उपक्रम राबविल्याबद्दल व आमचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद--अनिल गुंजाळ, भाऊसाहेब जपे, व लोंढे

शिर्डी( प्रतिनिधी )-राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील रयत शिक्षण संस्थेच्या निवडणूक स्कूल मधील माजी विद्यार्थी व एसएससी 1984 बॅचचे भाऊसाहेब निवृत्ती जपे, अनिल शंकर गुंजाळ व लोंढे हे नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा एसएससी 1984 बॅच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नुकताच सावळी विहीर येथे सत्कार केला. 


  भाऊसाहेब निवृत्ती जपे हे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये तर अनिल गुंजाळ हे निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर, येथे नोकरीला होते.व लोंढे हे सुद्धा एका ठिकाणी नोकरी होते. हे तिघे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा 1984 च्या एसएससी बॅचच्यावतीने सावळीविहीर येथे बोलावून सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सर्व माजी एसएससी 1984 ग्रुपचे माजी विद्यार्थी यांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी उपस्थित माजी वर्ग मित्रांनी सेवानिवृत्त झालेल्या अनिल गुंजाळ भाऊसाहेब जपे व लोंढे या मित्रांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जाकीर शेख, सुभाष बनकर, दीपक बर्डे, बाबासाहेब जपे, विलास कुसाळकर, संजय जगताप, लुईस पाळंदे, मधुकर लोंढे, कैलास काळे, सुधाकर जाधव, सोमनाथ गाडेकर, भदे, आदींसह 1984 बॅचचे दहावीचे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त झालेले अनिल गुंजाळ भाऊसाहेब जपे व लोंढे यांनी सर्व वर्ग मित्रांनी आम्हाला येथे बोलावून आमचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद मानले.

Post a Comment

0 Comments