मोकाट कुत्र्यांचे हल्ल्यांचे प्रमाण वाढले, एस आय आर गृहभेटी दरम्यान मतदान अधिकारी गंभीर, माळेगांव पिंपरी येथील घटना



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१७--शासनाच्या एस आय आर मोहिमेत गृह भेटी देऊन अर्ज वितरण करणाऱ्या बी एल ओ वर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना पिंपरी(माळेगाव) येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घडली या घटनेत मतदान केंद्र अधिकारी यांना तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

महादू पांडुरंग पंडित(वय ३८) असे कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव असून ते बी एल ओ म्हणून माळेगाव(पिंपरी) मतदान केंद्राचे काम पाहत आहे शुक्रवारी मतदारांचे एस आय आर चे फॉर्म वाटप व एस आय आर मोहीम राबविण्यात गृह भेटी देत असताना अचानक त्यांना गावातील मोकाट कुत्र्यांनी घेरले व त्यांना कडाडून चावे घेवून गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने ग्रामस्थांनी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे सोयगाव तालुक्यात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मोठा उच्छाद सुरू आहे काही भागातून अज्ञात व्यक्ती हे मोकाट कुत्रे रात्री वाहनातून सोयगाव परिसरात सोडून देत आहे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी आमखेडा,सोयगाव परिसरातील नऊ जणांवर एकाच दिवशी हल्ला केला होता.तर निंबायती येथे शाळेतून येणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थ्यांनिला गंभीर जखमी केले होते परंतु अद्यापही प्रशासणाला जाग आलेली नाही या मोकाट कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान सोयगाव पोलिसांनी निंबायती घटनेची दखल घेवून गटविकास अधिकारी सोयगाव यांना लेखी पत्र देऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सूचना दिल्या होत्या परंतु यावर अद्यापही अंमलबजावणी होतांना आढळून येत नसल्याने जनतेतून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments