मुलींनाही क्रीडा क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी... सौ आरतीताई गाढे (कबड्डी दिनानिमित्त मुलींना क्रीडा साहित्याचे वाटप)



टाकळीभान प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात मुलींना चांगली संधी असून यामध्ये चांगले यश मिळवल्यास करिअरच्या ही संधी उपलब्ध होतात असे प्रतिपादन सौ. आरतीताई गाढे यांनी केले. कबड्डी दिनाचे औचित्य साधून आझाद क्रीडा मंडळाच्या वतीने सौ. आरतीताई गाढे यांच्या हस्ते टाकळीभान येथील मुलींना क्रीडा साहित्याचे किट वाटप कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर पार पडला प्रसंगी त्या बोलत होत्या, 

 याप्रसंगी गावातील मान्यवर व महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.१५ जुलै हा दिवस भारतीय कबड्डीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे आणि 'कबड्डी महर्षी' म्हणून ओळखले जाणारे स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा दिवस राज्यभरात साजरा करण्यात येतो.

 त्याचप्रमाणे टाकळीभान येथे नवीन खेळाडू मुलींना क्रीडा साहित्याचे किट वाटून हा कबड्डी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर म्हणून प्रगतशील शेतकरी तुळशीदास उंडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, अर्जुन राऊत, मेजर विनोद रणनवरे, क्रीडा प्रशिक्षक रवींद्र गाढे,विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, ज्येष्ठ कबड्डी खेळाडू विजय साळवे, विकास साळवे, माया साळवे, सुमन साळवे, आदी उपस्थित होते.
   टाकळीभान गावाची राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळामुळे ओळख झाली असून या मातीने प्रो कबड्डी स्टार खेळाडू असलम इनामदार, शुभम पटारे,अजित पवार,सौरभ राऊत यांसारखे उत्कृष्ट ,नामवंत खेळाडू राज्य व देशाला दिलेले आहेत. येथील जुने कबड्डी खेळाडू, तसेच आझाद क्रीडा मंडळ व ओन्ली साई क्रीडा मंडळ हे नवीन युवा पिढीला कबड्डी खेळासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित करतात. या दोन्ही मंडळांने अनेक खेळाडू घडविले असून अनेक मुले शासकीय सेवेत भरती झालेले आहेत.

 व या खेळाचा नावलौकिक गावामध्ये टिकून ठेवण्यासाठी हे दोन्ही मंडळ महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन करून नवीन खेळाडू मुला मुलींना पत्रकार अर्जुन राऊत, मेजर विनोद रणनवरे यांनी कबड्डी दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच कबड्डी दिनानिमित्त टाकळीभानचा स्टार प्रो कबड्डी खेळाडू शिवम पटारे व उत्कृष्ट कबड्डी खेळाडू सौरभ राऊत यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
     आझाद क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक रवींद्र गाढे यांनी नवीन खेळाडू असलेल्या मुला मुलींनी यश मिळेपर्यंत परिश्रम घ्यावे व क्रीडा क्षेत्रामधून नवीन खेळाडू मुला, मुलांना भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी असल्याचे सांगितले व उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगीत खरात मामा , संदीप खंडागळे, बाबासाहेब खंडागळे,ताज मोहम्मद शेख, आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी युवक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments