रोटरी ईस्ट क्लब जळगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रींचे वाटप-----



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२८-- रोटरी ईस्ट क्लब जळगावचे अध्यक्ष डॉ. मनोज चौधरी,सचिव पुजा अग्रवाल व सोयगाव येथिल समाजसेवक नवनियुक्त रोटरी ईस्ट क्लब जळगाव चे सदस्य डिगांबर वाघ यांच्या अनमोल सहकार्याने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पावसाळ्यात पावसापासून संरक्षण व्हावे या हेतूने केंद्रप्रमुख फिरोज तडवी समाजसेवक तथा रोटरी क्लब चे नवनियुक्त सदस्य दिगंबर वाघ, मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान रोटरी ईस्ट क्लब जळगाव सदस्य पदी निवड झाल्या बद्दल समाजसेवक दिगंबर वाघ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सुरेखा चौधरी, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, गणेश बाविस्कर प्रतिभा कोळी, शुभम देसले, तानाजी चव्हाण, पुनम लाड हे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी रोटरी ईस्टचे क्लब आभार मानून भविष्यातही आमच्या विद्यार्थ्यासाठी असेच सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments