दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४ -सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या शेतकऱ्याकडे राष्ट्रीय कृत बँकांसह इतर खासगी असे एकूण चार लाख रु कर्ज फेडण्याची चिंता लागून होती दरम्यान त्यातच आठ दिवसापासून पावसाने मारलेली दडी यामुळे पुन्हा या शेतकऱ्याने धास्ती घेतली.
शामराव शेनफड जाधव ( वय ६०) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे रात्री कुटुंब गाढ झोपेत असतांना राहत्या घरात पत्राच्या अँगलला गळफास घेतला आहे दरम्यान पहाटे कुटुंब झोपेतून उठल्यावर शामरावचा मृतदेह घरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला दरम्यान त्यांना तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी सोयगाव पोलीस ठाण्याचे शांताराम सपकाळ, गजानन दांडगे यांनी घटनेची पंचनामा केला. शवविच्छेदन साठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ खंदारे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा दोन मुली असा परिवार आहे. महसूल विभागाने अद्यापही घटनेचा पंचनामा केला नव्हता.
चौकट;-खरिपाच्या पिकांची पावसा अभावी परिस्थिती खराब झाली होती गलवाडा शिवारात त्यांची सहा एकर जमीन आहे यंदा त्यांनी मक्याची लागवड केली मात्र पाऊस नसल्याने मक्याच्या पिकांनी माना टाकल्या होत्या त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती
0 Comments