लोणी ÷ प्रतिनिधी ( रूपाली भालेराव ) कोल्हार भगवतीपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरफाटा शाळेतील विद्यार्थ्यांना स्कायलाईट ग्रुप कोल्हार यांच्या वतीने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. स्कायलाईट ग्रुपचे सदस्य श्री. अरुणराजे फोफसे पाटील यांचे चिरंजीव शौर्य याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामपूरफाटा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. शौर्यच्या वाढदिवसाला इतर खर्च करण्यापेक्षा जि.प.प्राध.शाळा रामपूरफाटा शाळेला दोन फॅन व ऑफिस कामासाठी प्रिंटर भेट देऊन स्कायलाईट ग्रुपने शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या भावनेतून सदर साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यामागे मनोदय असल्याची भावना यावेळी श्री. अरुणराजे फोफसे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी स्कायलाईट ग्रुपचे सदस्य श्री. शरदनाना खर्डे पाटील, निलेश संपतराव खर्डे पाटील, श्री. सचिन उत्तमराव राऊत , श्री. वसंतराव खर्डे पाटील, श्री. शिवाजी शिपणकर, निलेश विधाते, शंकर शिपणकर, श्री. नानासाहेब गायकवाड हे उपस्थित होते.
रामपूरफाटा शाळेस केलेल्या भरीव मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवटे सर यांनी स्कायलाईट ग्रुप कोल्हार व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. श्री. वसंतराव खर्डे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्कायलाईट ग्रुपच्या या कौतुकास्पद निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. वाढदिवस साजरा करण्याची ही नवी आणि समाजाभिमुख पद्धत इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे करत राहू, असा निर्धार स्कायलाईट ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी बोलून दाखवला.
सहसंपादक÷ साबळे ज्ञानेश्वर
0 Comments