श्री सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांनी घेतले श्री भगवती मातेचे दर्शन! निर्मळ पिंपरी, बाभळेश्वर, कोल्हार, गुहा येथे दिंडीचे जोरदार स्वागत!

वारी पंढरीची (दुसरा दिवस)-

गुहा -( राजकुमार गडकरी)-

श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारीची परंपरा खूप जुनी आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या पायी दिंडी सोहळ्यात सामील करून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, आदी संतांनी पंढरपूर वारीची परंपरा मोठ्या उत्साहाने सुरू ठेवली व ती पुढे आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. 
मोठ्या भक्ती भावात आजही पंढरपूर वारीची ही परंपरा मोठ्या आतुरतेने केली जात असून अनेक छोट्या मोठ्या दिंड्या सध्या पंढरपूरकडे जात आहेत .दि.25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी असून या दिवशी किंवा आदल्या दिवशी सर्व दिंड्या पंढरपुरात पोहोचतात. तसे प्रत्येक दिंडी चालक हे नियोजन करत असतो. आगाऊ मुक्कामाच्या व दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी पत्रिका पाठवून दिंडीची तारीख व वेळ अन्नदात्यांना कळविली जाते.प्रत्येक दिंडीमध्ये महाराज असतात. 
चोपदार असतात. मृदंगाचार्य गायनाचार्य विणेकरी चोपदार भजनी मंडळ टाळकरी तुलसी डोक्यावर घेणाऱ्या महिला भगव्या पताका खांद्यावर घेतलेली वारकरी, टाळकरी असे सर्व दिंडीत चालत असतात. महाराजांचे मार्गदर्शन असते .कीर्तन प्रवचन काकडा हरिपाठ भजने होत असतात. त्यामुळे सर्वत्र एक आषाढी एकादशीच्या अगोदर पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पायी दिंड्यांनी सर्व रस्ते गजबजुन गेलेले असतात. सध्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अनेक दिंड्या नगर मनमाड या महामार्गाने जात आहेत. अनेक छोट्या मोठ्या दिंड्या अहिल्या नगर जिल्ह्यातूनही श्री क्षेत्र पंढरपूर जात आहेत. विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत चहा नाश्ता जेवण फराळ औषधे पिण्याचे पाणी आदी संघटना कडून होत आहे. असा हा अध्यात्मिक व पारंपरिक व मोठा आनंदाचा दिंडी सोहळा प्रत्यक्षात सहभागी होऊन प्रत्येक जण मनोमन मोठा समाधानी दिसून येत आहे. अशा या अध्यात्मिक व मोठा आनंद देणाऱ्या सर्व दिंड्यांपैकी सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांची श्रीक्षेत्र कोऱ्हाळे देर्डे,चांदेकसारे , सावळीविहीर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी जात असून या दिंडीचा दुसरा मुक्काम गुहा येथे असल्याने पहाटेच राहता येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातून दर्शन करून निघून पिंपरी निर्मळ येथे ह भ प गोरक्षनाथ घोरपडे,हभप भाऊसाहेब काशिनाथ पवार व भाऊसाहेब कारभारी पवार, यांच्या वस्तीवर भजन होऊन त्यांच्या वतीने व दिंडीला चहा नाश्ता देण्यात आला , यजमानांचा सत्कार दिंडीच्या वतीने भीमा भाऊ वर्पे यांनी केला. येथून पुढे चालत येऊन बाभळेश्वर येथे ह भ प राजू भाई पटेल पुनम मशिनरी तसेच हभप साहेबराव भाऊराव शेलार यांच्यातर्फे वारकऱ्यांना चहा व नाश्ता देण्यात आला. हॉटेल बंधूंचा सत्कार सागर जाधव यांनी केला. त्यानंतर दिंडी कोल्हार येथे आली. दिंडीतील वारकऱ्यांनी येथे श्री तुळजाभवानी माता, श्री रेणुका माता ,श्री महालक्ष्मी माता, व श्री सप्तशृंगी माता या चारही शक्तिपीठ यांच्या मूर्तीअसणाऱ्या श्री भगवती माता देवीचे मंदिरात जाऊन तेथे सर्व वारकऱ्यांनी आषाढीच्या पहिल्या मंगळवारी दर्शन घेतले त्यानंतर पुढे प्रवरा नदी किनारी असणाऱ्या श्री शिव भोले व श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर प्रवरा नदी पार करून कोल्हार खुर्द येथे दिंडी आली.
तर कोल्हार खुर्द येथे ह भ प गोविंदराव बाबुराव शिरसाठ यांच्यातर्फे दुपारचे भोजन झाले. भोजनापूर्वी भजनाचा कार्यक्रम झाला. शिरसाट बंधूंचा सत्कार हभप राजू सुराळे यांनी केला. यावेळी शिरसाठ व त्यांचे चुलते बंधू व परिवार उपस्थित होता. त्यानंतर दिंडीने प्रस्थान केले व नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या प्रसिद्ध व सुंदर अशा श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये येऊन तेथे दर्शन करत येथे थोडी विश्रांती घेऊन दिंडीचे दुपारी प्रस्थान होऊन नगर मनमाड रस्त्याने गुहा येथे हभप ज्ञानदेव श्रीपतराव कोळसे यांच्या वस्तीवर सायंकाळी दिंडी पोहोचल्यानंतर तेथे त्यांच्यातर्फे दिंडीला भोजन तसेच बाबासाहेब रामकृष्ण कोळसे यांच्यातर्फे दिंडीला चहा देण्यात आला. गुहा येथील ह भ प ज्ञानदेव श्रीपतराव कोळसे पाटील यांच्या वस्तीवर दिंडीचा मुक्काम होता. महाप्रसादा अगोदर येथे सर्वजणांनी फ्रेश होऊन हरिपाठ भजने गाऊन आरती करत महाप्रसाद घेतला . दिंडीच्या वतीने हभप ज्ञानदेव कोळसे पाटील व बाबासाहेब रामकृष्ण कोळसे पाटील यांचा सन्मान करून धन्यवाद मानण्यात आले. दुसऱ्या दिवसाचा मुक्काम गुहा येथे जय हरी म्हणत सर्वांनी केला.

Post a Comment

0 Comments