नांदगाव अहिल्यानगर (राजकुमार गडकरी याजकडून--
-महाराष्ट्र हे साधुसंत महात्मे व विविध धार्मिक स्थळे असणारे राज्य आहे.
या राज्यात अध्यात्मिक परंपराही मोठी आहे. येथे अनेक वर्षापासून चाललेली परंपरा म्हणजे पंढरपूरची पायी वारी होय. वर्षातून आषाढी व कार्तिक अशी पायी वारी तसेच काही दिंड्या ह्या दर एकादशीला पंढरपूर पायी वारी करत असतात. मात्र सर्वात मोठी ही आषाढी पायी वारी समजली जाते. या आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे.पंढरपूर आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत काढलेली पदयात्रा असते.
श्री पांडुरंगाचा रथ, भगव्या पताका हातात घेतलेली वारकरी, विना टाळ मृदूम वाजवणारे भाविक,महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व हरिनाम आणि भजने गात पंढरपूरकडे पायी मोठ्या भक्ती भावात व एकमेकांचे दर्शन करत माऊली म्हणत पायी चाललेला हा भक्तीमय समुदाय म्हणजेच वारी होय. नित्यनेमानी वारी करणारा वारकरी असतो. 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय समजला जातो. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी असते. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक भक्तीमय असा आनंद सोहळा असतो. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेतस्नान, आणि पांडुरंगाचे दर्शन’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे . म्हणूनच दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर कडे जात आहेत. रस्त्याने सर्वत्र पायी चालणारे भाविक ,हरिनामाचा गजर, प्रवचन भजन कीर्तन ऐकू येत असते. आताअशा या असंख्य दिंड्या सध्या पंढरपूरकडे जात असून सद्गुरु नारायणगिरीजी महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर कडे हरी नामाचा गजर करत चालला आहे. अनेक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहे.रस्त्या तठिकठिकाणी अनेक अन्नदात्यांकडून चहा नाश्ता फळे बिस्किटे, पिण्याचे पाणी , फराळ, जेवण स्वयंसेवक ,संस्था,व मोठ्या भक्ती भावाने नागरिक वारकऱ्यांना देत आहे.
वारकऱ्यांमध्येच सेवेकरी पांडुरंग पाहत आहे.सर्वच दिंडीतील वारकऱ्यांना गरजू भाविकांना मोफत रेनकोट व इतर गरजवंत असणाऱ्या वस्तू देण्यात येत आहे. ही सेवा पांडुरंगाची सेवा म्हणून सर्वजण ठिकठिकाणी करताना दिसत आहे. प्रत्येक दिंडीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. गावागावात वस्त्या वस्त्यांवर दिंडी येताच पालखी रथाचे, विणेकरी व पालखीचे पुष्पहार घालून स्वागत होत आहे. पांडुरंगाचा जयजयकार होत आहे. असा हा भक्तिमय सोहळा गावात सध्या दिसून येत आहे. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज दिंडी देर्डे कोराळे ही गुहा येथून पहाटे निघून नांदगाव अहिल्यानगर कडे निघाली असता राहुरी येथे हभप अण्णासाहेब नारायणराव शेटे व स्वामी समर्थ भक्त परिवार तसेच हभप सुनील भालचंद्र फडके यांच्या वतीने यांच्या वस्तीवर चहा व नाश्ता वारकऱ्यांना देण्यात आला. ह भ प शेटे अण्णा यांच्या बंगल्याच्या प्रांगणात दिंडीचे आगमन होताच जोरदार स्वागत झाले. विणेकरी व श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे यजमानांकडून पूजन त्यांच्या व परिवाराच्या हस्ते करण्यात आले. भजनाचा कार्यक्रम झाला . त्यानंतर शेटे आण्णा व परिवाराच्या हस्ते आरती झाली. यावेळी दिंडीतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी राजू तरकसे, भाना माऊली व मित्रमंडळी भाविक उपस्थित होते. त्यानंतर येथे यजमानांचा मोठ्या भक्तीमय भावात निरोप घेत दिंडीचे पुढे प्रस्थान झाले .राहुरी शहरातून राहुरी कृषी विद्यापीठ येथे ह भ प डॉक्टर दत्तात्रय विठोबा कुसाळकर यांच्यातर्फे राहुरी कृषी विद्यापीठातील एका हॉल मध्ये दिंडीतील वारकऱ्यांना दुपारचे भोजन देण्यात आले. तर पूर्वी हरिनाम झाला, भजने झाली. डॉक्टर दत्तात्रय कुसाळकर यांचा दिंडीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय कुसाळकर व त्यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यानंतर येथे थोडी विश्रांती घेऊन दिंडीचे नांदगाव कडे प्रस्थान झाले. वांबोरी फाटा येथे थोडा वेळ विश्रांती घेऊन नांदगाव च्या अलीकडे खालसा पंजाब ढाबा येथे हभप राजेंद्र सेठ पळसे यांच्यावतीने वारकऱ्यांना चहा नाश्ता झाला तसेच सायंकाळी हभप शकुंतलाबाई वसंतराव आघाव यांच्या घरी प्रांगणात हरिपाठ व आरती होऊन ह भ प शकुंतलाबाई वसंतराव आघाव यांच्यातर्फे वारकऱ्यांना भोजन देण्यात आले .भोजनानंतर त्यांचा दिंडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.व धन्यवाद मान्यता आले. त्यानंतर नांदगाव येथील श्री हनुमान मंदिरात सर्व वारकऱ्यांनी रात्री मुक्काम केला. दिंडीचा हा तिसरा दिवस होता. मोठ्या उत्साहात हा तिसरा दिवस दिंडीचा भक्तिमय वातावरणात पार पडला.
0 Comments