फर्दापूर बीट अंतर्गत अंगणवाडी बालकाची फर्दापूर येथे आरोग्य तपासणी , ३० बालकांना मोफत औषधी वाटप --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१३-- सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या अंगणवाडी मध्ये दि.१३ शनिवारी प्रकल्प कार्यालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर बीट अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. फर्दापूर बीट अंतर्गत असलेल्या फर्दापूर, फर्दापूर तांडा, वरखेडी बुद्रुक, ठाणा येथील अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी बालके व पालकांसह आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदवला होता. 

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सावळदबारा पथक प्रमुख डॉ.रमेश चव्हाण , डॉ. शितल डोके,यांनी उपस्थित बालकांची आरोग्य तपासणी केली तर औषध निर्माता आकाश चवरे यांनी बालकांना औषधी दिली. यावेळी बालकांना सकस आहार द्या ,त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवा, कुपोषण मुक्ती साठी पालकांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे असल्याचे डॉ.रमेश चव्हाण यांनी उपस्थित पालकांना सांगितले तर महिलांशी डॉ.शितल डोके यांनी संवाद साधला.दरम्यान कुपोषण कमी करण्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी हा उपक्रम सुरू केला असून्य संजय शहापूरकर यांच्या माध्यमातून बालकांना मोफत औषधी वाटप करण्यात येते. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वितेसाठी फर्दापूर बीट च्या पर्यवेक्षिका रिता लांडगे यांनी परिश्रम घेतले.यावेळी अंगणवाडी सेविका हर्षा परदेशी, मुनिरा शेख,वर्षा खेडेकर, आशा पाटील,वर्षा काळे, सुनिता आगळे, इरफाना शेख, अलका जाधव, संकुतला पानपाटील, मुक्ता चव्हाण, द्रोपदा मगरे,मदतनीस आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फर्दापूर बीट अंतर्गत अंगणवाडी बालकाची फर्दापूर येथे आरोग्य तपासणी , ३० बालकांना मोफत औषधी वाटप -- 

Post a Comment

0 Comments