आठवी राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न;



शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाची ७१ पदकांची दैदिप्यमान कामगिरी
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी व केटलबेल स्पोर्ट्स इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वी राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा दि. ४ ते ७ जून २०२६ दरम्यान श्री साईबाबा सांस्कृतिक भवन, शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाली.

देशातील विविध राज्यांतील खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण २८ सुवर्ण, २८ रौप्य व १५ कांस्य अशी ७१ पदके जिंकली.
संस्थेनिहाय कामगिरीमध्ये श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलने २३, श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरने १३, श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेजने ३ आणि श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयाने ३२ पदके पटकावली.
या यशाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ, प्राचार्य डॉ. संतोष औताडे तसेच संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशामागे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे, श्री कैलास शेळके, श्री सुजय बाबर आणि श्री महादू चांदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवात आणखी भर पडली असून भविष्यातही खेळाडू अधिक यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments