दिलीप शिंदे
सोयगाव दि.२३ --- सोयगाव तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्षात नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याचा प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे.
दरम्यान सन २०२३ मध्ये ही गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र त्यांच्यावर काय कार्यवाही करण्यात आली हे मात्र गुलदस्त्यात असल्याने कर्मचारी गैरहजर राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्षात नियुक्ती असलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
या बाबत सविस्तर माहिती, नैसर्गिक आपत्ती बाबतची माहिती तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे, अपाद ग्रस्ताना तातडीने आवश्यक मदत पुरविणे शक्य व्हावे यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षा मध्ये उपस्थित राहून आपत्ती बाबतची माहिती महसूल मंडळ निहाय झालेल्या पर्जन्यमानाची नोंद घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. कर्तव्यस्थळी विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले असून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना सारख्या अतिशय संवेदनशील व जबाबदारीच्या कामामध्ये आपण हलगर्जीपणा करीत आहे आपण शासकीय सेवेत असून देखील आपले वरील प्रमाणे वर्तन हे निश्चितच अशोभनीय व खेदजनक आहे आपण शासनाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याने सदरील नोटीस प्राप्त झाल्यापासून दोन दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून आपला लेखी खुलासा सादर करावा विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास आपले काहीही एक म्हणणे नाही असे गृहीत धरण्यात येईल तसेच आपण सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याची खात्री पटल्यास आपण विरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ म.ना.से. शिस्त व अपील नियम १९७९ चे तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल असे गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे होती मात्र कोणतीही कारवाई तहसीलदार यांच्याकडून करण्यात आली नसल्याने कर्मचारी नियत्रंण कक्षात उपस्थित राहत नसल्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्ष नावाला कर्मचारी मात्र गावाला असे परिस्थिती सोयगाव तहसील कार्यालयात दिसून येत आहे.याकडे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लक्ष देऊन गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई कारवाई अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments