दिलीप शिंदे
सोयगाव दि.२३-- सोयगाव येथे साने हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १५० महिलांनी या आरोग्य शिबिरात सहभाग घेऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.यावेळी डॉ. कल्पक साने, डॉ. मयुरी सानप, तेजस्विनीताई काळे, सरपंच नंदाताई आगे, डॉ. स्वाती काळे, तालुका अध्यक्ष संजय पाटील, माजी नगराध्यक्ष कैलास दादा काळे, जिल्हा चिटणीस सुनील गावंडे, शहराध्यक्ष मंगेश सोहनी आदी प्रमुखसह मयूर मनगटे, संजीवन सोनवणे, गजानन पवार, विजय गव्हाड, महेश मानकर, सुनील ठोंबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान उद्घाटन प्रसंगी बोलताना जि.प. सदस्या पुष्पाताई काळे यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.शिबिरात महिलांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच स्त्रीरोग, पोषण, रक्तक्षय, मातृ आरोग्य व इतर आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सुमारे १५० महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी साने हॉस्पिटल व सर्व सहकार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
0 Comments