अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी संतोष मुटकुळे यांची नियुक्ती

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी संतोष मुटकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस विभागातील प्रशासकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. अहिल्यानगर येथे गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 


अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुटकुळे यांच्या नियुक्तीमुळे एलसीबीच्या कारवाईला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यावर त्यांचा भर राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments