राजुरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ सोमनाथ गोरे पाटील तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती हिराबाई खर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आहे. राहता तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या झालेल्या बैठकीत ज्येष्ठ संचालक डॉ सोमनाथ बाळासाहेब गोरे यांची चेअरमन पदी तर राजुरी भजनी मंडळ सदस्या हिराबाई बाप लक्ष्मण खर्डे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड सहाय्यक निबंध कार्यालयामधील पाटील साहेब व वाकचौरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व युवा नेते डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने संस्थेची वाटचाल प्रगतीचे दिशेने चालू आहे.
संस्थेच्या वतीने गावातील गोरगरिबांना रेशन वाटप अतिशय प्रामाणिकपणे केले जाते. संस्थेच्या खत डेपो मधून गोरगरीब शेतकऱ्यांना सर्व प्रकारची खते, बियाणे वेळेवर उपलब्ध करून दिले जातात.A.D.C.C. बँकेच्या माध्यमातून राजुरी सोसायटीतील सभासदांना वेळेवर कर्ज वाटप केले जाते. मागील वर्षापासून कर्जमाफीच्या नादात 80% लोकांनी भरणा वेळेवर न केल्यामुळे आपोआपच संस्था आर्थिक अडचणीत आहे. कर्जमाफीची रक्कम संस्थेत जमा झाल्यानंतर सर्व सभासदांना जास्तीत जास्त डिव्हीडंट वाटप संस्थेतर्फे करण्यात येईल.संस्थेचे मावळते चेअरमन संजय रायभान गोरे व मावळते व्हाईस चेअरमन बाळासाहेब भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करून वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नूतन चेअरमन डॉ सोमनाथ गोरे यांनी राजुरी सोसायटी ही आपली मातृसंस्था असून या माध्यमातून आपल्याला मानसन्मान मिळालेला आहे.
यातून उतराई होण्यासाठी आपण संस्थेशी प्रामाणिक राहून संस्था उत्तर कशी प्रगती करेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक नानासाहेब दादा गोरे, चंद्रभान अण्णा गुंजाळ
अशोक शहाराम गोरे, सुरेश नारायण कसाब,सौ.निर्मला सूर्यभान गोरे, सोपान भिकाजी कदम बाबासाहेब बबन राहीज,गंगाधर रामजी लाळगे सुधीर बन्सी गोरे हे सर्व संचालक तसेच संस्थेचे सचिव बाळासाहेब गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
फोटो - राजुरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ सोमनाथ गोरे तर व्हॉइस चेअरमन पदी हिराबाई खर्डे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना ज्येष्ठ संचालक नानासाहेब गोरे दिसत आहेत. (छायाचित्र संतोष गोरे राजुरी).
0 Comments