त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनामनात संकल्प करून हिंदू धर्माची आधारस्तंभ व कामधेनू असणारी व हिंदू संस्कृतीत माता म्हणून मानली जाणारी गाय आहे . तिचे संरक्षण म्हणजे धर्माचे रक्षण आहे. जेव्हा भारत हिंदू राष्ट्र बनेल, तेव्हा गोहत्या पूर्णपणे बंद होईल आणि गोसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
गोमातेच्या सान्निध्यातून सात्विकता, शांती आणि समृद्धी समाजात वाढेल. त्यासाठी गोमाता संरक्षणासाठी आतापासूनच प्रत्येकाने मनमनात संकल्प केला पाहिजे. असे सांगत देशात भारत हिंदू राष्ट्र बनल्यानंतर माता-भगिनींची सुरक्षा अधिक सक्षमपणे जोपासली जाईल.
समाजातील स्त्री ही शक्तीस्वरूपा आहे. जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवतांचा वास असतो. हिंदू राष्ट्रात प्रत्येक माता आणि भगिनी सुरक्षित असेल.
संस्कार, धर्मशिक्षण आणि कठोर कायदे यांच्या आधारावर स्त्रियांचा सन्मान अबाधित राहील. तसेच गंगा आणि सर्व नद्या, निसर्गशुद्धी होईल जीवनाचे पुनरुज्जीवन
गंगा नदी ही केवळ नदी नाही, तर भारताच्या आत्म्याची धारा आहे. हिंदू राष्ट्रात गंगा पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ होईल.
पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश — हे पंचमहाभूत प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण होईल.पर्यावरणाचे संतुलन राखणे हेच खरे धर्मपालन आहे.
हिंदू राष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल.धर्माधारित अर्थव्यवस्था ही शोषणमुक्त असेल, जिथे प्रत्येकाला आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल.
अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा सर्वांसाठी सुनिश्चित केल्या जातील.आज समाजात व्यसनाधीनता ही एक मोठी समस्या आहे. हिंदू राष्ट्रात मद्य, तंबाखू आणि इतर दुर्व्यसनांपासून मुक्तता घडवली जाईल.ध्यान, योग, आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून व्यक्तीला अंतर्मुख करून शुद्ध जीवनशैली अंगीकारली जाईल.
तसेच भगवान शिव म्हणजेच भोलेनाथ हे संहार आणि पुनर्निर्माणाचे देवता आहेत. जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा शिवशक्ती जागृत होऊन धर्माची पुनर्स्थापना करते.
हा संकल्प भारत हिंदू राष्ट्र बनेल, समाज शुद्ध होईल, निसर्ग संतुलित होईल — हा केवळ मानवाचा नाही, तर दैवी इच्छेचा भाग आहे.
भोलेनाथाच्या कृपेने हा संकल्प निश्चित पूर्ण होईल. असे सांगत
भारत हिंदू राष्ट्र होणे म्हणजे सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आहे.
हा मार्ग प्रेम, सत्य, त्याग आणि साधनेनेच साकार होईल.
प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनात धर्माचे पालन करून, समाजहिताचा विचार करून आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करून या संकल्पात सहभागी व्हावे. कारण
"धर्मो रक्षति रक्षितः" — धर्माचे रक्षण करणाऱ्याचे धर्म स्वतः रक्षण करतो. असे शेवटी श्री नर्मदेश्वर सेवाधाम शचे महंत शिवरुद्राक्षमुकुटधारी,
0 Comments