टाकळीभान प्रतिनिधी -प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने सुख, शांती, आणि सहजराजयोगाचा संदेश देणाऱ्या 'स्वर्णिम भारत रथा'चे टाकळीभान येथे आगमन झाले.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते स्थाचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीरामपूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंदादिदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर उद्योगपती अश्पाक शेख यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या जागतिक शांततेच्या कार्याचे कौतुक केले,आपल्याला जगण्यासाठी उत्तम मार्ग आहे,. मानवी जीवनातील भय, चिंता, रोग आणि तणावमुक्तीसाठी सेवाकेंद्राला भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मौलाना अहमद शेख, पो. हेडकॉन्स्टेबल कुमार बैसाने, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, मधुकर कोकणे, अविनाश लोखंडे काकासाहेब डिके विष्णुपंत पटारे, आप्पासाहेब रणनवरे, गोरख खुर्द, मधुकर गायकवाड, बाबा सय्यद, ब्रहमाकुमार शिके भाईजी, रखी भाईजी, कोकाटे भाईजी रामनाथ भाईजी, गोयल भाईजी व सर्व ब्रहमाकुमार कुमारी, भाऊ-बहिणी व सेवाधारी उपस्थितीतयांच्यासह सर्व ब्रह्माकुमार-कुमारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments